ESWIMS वैशिष्ठे –
न्यायालयाकडुन समन्स आणि वॉरंटची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पोलिस स्टेशन, SDPO, Addl. SP, PI LCB आणि SP यांच्या डॅशबोर्डवर प्राप्त होतात.
समन्स किंवा वॉरंट सिस्टममध्ये रेकॉर्ड केल्यावर नियुक्त अधिकाऱ्याला त्यांच्या मोबाईलवर सर्व तपशीलांसह संदेश मिळेल. त्यानंतर समन्स किंवा वॉरंटची अंमलबजावणीच्या अंतिम तारखेपूर्वी नियुक्त अधिकाऱ्याला अलर्ट मिळतो.
ESWIMS प्रणाली समन्स आणि वॉरंटची माहिती रेकॉर्ड करुन अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची स्थिती ट्रॅक होत असल्याने SDPO, Addl. SP, PI LCB, SP हे पोलिस स्टेशनच्या समन्स आणि वॉरंटची स्थिती पाहू शकतात.
साप्ताहिक, मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक सारांश वापरून विविध प्रकारचे अहवाल तयार केले जाऊ शकतात.
ESWIMS चे फायदे –
ESWIMS प्रणालीत केस तपशील आणि कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करून प्रक्रिया करण्यात मानवी श्रम कमी करुन त्रुटी आणि विलंब होण्याची शक्यता कमी करते.
प्रणाली निर्दिष्ट मुदतीनंतर उच्च अधिकाऱ्यांना आपोआप प्रकरणे नियुक्त करते.
प्रणाली अशा प्रकारे डिझाइन आणि विकसित केली गेली आहे की ती इतर कोणत्याही जिल्ह्यात सहजपणे स्वीकारता येईल.
मॅन्युअल प्रक्रिया स्वयंचलित असल्याने आणि या प्रणालीद्वारे सूचना संदेश वेळेवर पाठवले जातात. ही प्रणाली समन्स/वॉरंट प्रकरणांची पूर्तता सुधारण्यास मदत करेल.